
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा येथील जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळा ची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.मंडळ यावर्षी ५१ वे उत्सव वर्ष साजरे करत आहे.मंडळाच्या वतीने नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.या वर्षीही नऊ दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळाची बैठक दि.२५ सप्टेंबर रोजी जय जगदंबा मंदिरात पार पडली.मंडळाचे सचिव प्रशांत लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी मुकुंद पवार,उपाध्यक्ष कृष्णा विरूध्दे,सचिव प्रशांत रेणके-सुरज लोहार,कार्याध्यक्ष ओम ठेले- शिवशरण स्वामी निवड करण्यात आली यावेळी सदस्य म्हणून प्रशांत काळे ,सुनिल देशमाने, सुनील ठेले, प्रेम लांडगे, बाळु माळी, बाळू पाटील ,विजय महानुर, पंडित लोहार ,चेतन पवार,प्रशांत जाधव, हरी लोखंडे, गणेश खबोले ,बालाजी माशाळकर, सिद्धू वैरागकर प्रतीक विरूध्दे रमेश होंडराव, महेश कुंभार,नितीन पवार,आकाश विरुधे,नितीन वाघे,श्रीकांत तिगाडे,ऋषिकेश तिगाडे,अनिल ठेले, राजू भोरे,अमित महानुर, बाळु माशाळकर,इराण्णा स्वामी,आकाश लोहार,मंगेश बनशेट्टी, समर्थ माशाळकर उपस्थित होते.