सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आगामी काटगाव पंचायत समिती निवडणूक लढवणार -बंडू धुत्ते

सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आगामी काटगाव पंचायत समिती निवडणूक लढवणार -बंडू धुत्ते
मंगरूळ /चांदसाहेब शेख
सर्वसामान्य नागरिक , शेतकरी , शेतमजूर यांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी आगामी काटगाव पंचायत समिती निवडणूक लढवणार असल्याचे मत खानापूर ता. तुळजापूर ग्रामपंचायत सदस्य बंडू धुत्ते यांनी दैनिक तरुण भारत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
बंडू धुत्ते हे उच्चशिक्षित असून खानापूर ग्रामपंचायत सदस्य झाल्यापासून त्यांनी गावपातळीवरील विविध प्रश्नांना वाचा फोडून त्या सोडवण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले आहे तसेच काटगाव व परिसरातील युवकांचे संघटन करून सतत संपर्कात असल्याने आश्वासक नेतृत्व म्हणून अल्पावधीतच त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याचे असलेले रेशनकार्ड , घरकुल योजना , स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्व कुटुंबाना शौचालय , पीक विमा , पीक कर्ज , ई श्रम कार्ड काढण्यासाठी मार्गदर्शन , प्रत्येक शासकीय योजनेची परिपूर्ण माहिती गावातील नागरिकांना पुरवणे यासारखे विषय हाताळले आहेत तसेच विविध महापुरुषांच्या जयंत्या साजरी करण्यासाठीही सतत प्रयत्नशील राहून पुढाकार घेतात व या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात हिरीरीने सहभागी होतात याच कामाच्या जोरावर येणारी पंचायत समिती निवडणूक काटगाव मतदार संघातुन मिळेल त्या पक्षाची उमेदवारी घेऊन लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले व भविष्यात सुशिक्षित बेरोजगार , शेतकरी , शेतमजूर व युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मतदार संघातील सुजाण नागरिकांनी येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणूकीत संधी द्यावी असे आव्हानही शेवटी त्यांनी केले