न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आपले म्हणणे एका क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचवने मोबाईलच्या माध्यमातून शक्य – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

आपले म्हणणे एका क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचवने मोबाईलच्या माध्यमातून शक्य – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तुळजापूर येथे सोशल मीडिया मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया टीमचे प्रमुख यशराज पारखे – पाटील उपस्थित होते काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांच्या विकासासाठी आखलेला कृती आराखडा याबाबतची सर्व माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण जिल्हा परिषद चे माजी बांधकाम सभापती मुकुंदराव डोंगरे उपस्थित होते. पुढे बोलताना पारखी पाटील म्हणाले की निवडणुकीचे तंत्र बदललेले आहे आपले म्हणणे एका क्षणात लाखो लोकांपर्यंत पोहोचवने मोबाईलच्या माध्यमातून शक्य झालेले आहे. तसेच हँश टँग वापरामुळे प्रसिध्दीचा हेतु साध्य होता ऐकाने स्टेटस ला ठेवले तर त्याच्या प्रभाव पडत नाही माञ ऐकजुटीने स्टेटस ठेवले तर त्याचा सर्वदूर प्रसार प्रचार होतो

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड, नळदुर्ग शहर काँग्रेसचे अध्यक्ष नवाज काजी, युवा नेते ऋषिकेश मगर, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरकर, माजी जि. प. सदस्य दिलीप सोमवंशी, कुलस्वामिनी सूतगिरणीचे संचालक रसिक वाले, अनिल हंगरगेकर, माजी नगरसेवक अमर मगर, बाजार समितीचे संचालक रामचंद्र ढवळे, भालचंद्र मगर, रविराज कापसे, सुभाष हिंगमिरे, अमर माने,सुधीर गव्हाणे, वडवले प्रदेश युवक काँग्रेस समितीचे महासचिव अभिजीत चव्हाण यांचे सह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना मधुकरराव चव्हाण म्हणाले की मी सायकल,बैलगाडी, मोटरसायकल, जीप व कार ने प्रचार केला. काळानुसार प्रचाराची साधने बदलत आहेत. आत्ताचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. तुम्ही घरबसल्या प्रचार करू शकता. मोबाईलच्या माध्यमातून त्यातील अनेक सुविधा वापरून प्रचार करू शकता. त्यासाठीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने श्री यशराज पारखी यांना याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी पाठवले आहे. त्यामुळे याबाबतीत तुम्हाला उद्भवणाऱ्या समस्या याचे निराकरण या बैठकीमध्ये करावे, आणि आधुनिक साधनांची कास धरून काँग्रेसच्या प्रचाराची मोहीम राबवावी. यामध्ये युवकांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने युवक वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक सुनील रोचकरी व तालुका काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया टीमने केले होते.
मान्यवरांचे स्वागत सुनील रोचकरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजित हंगरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे