ब्रेकिंगमहाराष्ट्र
सुदेश माळाळे ‘ मिलिंद सन्मान ‘पुरस्काराने सन्मानित

सुदेश माळाळे ‘ मिलिंद सन्मान ‘पुरस्काराने सन्मानित
धाराशिव/न्यूज सिक्सर
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या आयोजित नागसेन फेस्टीव्हल 2023 च्या संयोजन समितीच्या वतीने सुदेश माळाळे यांना मिलिंद सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार शनिवार, 1 एप्रिल रोजी संभाजीनगर येथे डॉ. अतुल भोसेकर(संयुक्त लेणी परिषद, महाराष्ट्र) डॉ. यशवंत खडसे, डॉ. पुष्पा गायकवाड आणि कवियत्री कविता मोरवन यांच्या हस्ते सुदेश माळाळे यांना प्रदान करण्यात आला आहे. या वेळी संयोजन समितीचे पदाधिकारी, विद्यार्थी, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.