ब्रेकिंग
अवैध प्रकारे दारू विकणाऱ्या,बाळगणाऱ्या लोहारा,धानुरी,वडगांव(गा) येथील तिघावार कारवाई…
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा पोलीस ठाणेच्या पथकाने हद्दीतील तीन ठिकाणी छापे टाकून अवैध रित्या देशी विदेशी दारू विकणाऱ्या,बाळगणाऱ्यावर कारवाई केली.लोहारा तालुक्यातील धानुरी येथे संतोष शंकर थोरात (वय ४०) यांच्याकडे त्यांच्या राहत्या घरासमोर अंदाजे ४१६० रुपये किंमतीच्या देशी विदेशी १६० सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.तर लोहारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शेखर राजेंद्र रवळे (वय २६) यांच्याकडे अंदाजे ५९२० रुपये किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.तर वडगाव (गांजा) येथील शिवारात असलेल्या हॉटेल दुर्गा माता च्या पाठीमागे अंदाजे १२८० रुपये किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या १६ सिलबंद बाटल्या रवी नारायण नेरला (वय ४४) यांच्याकडुन जप्त करण्यात आल्या.