न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

तुळजापूर ‘तालुक्यासाठी’ प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; उमेदवारांवर दाखल गुन्ह्यांचे तीन वेळा प्रसिध्दीकरण बंधनकारक अन्यथा कारवाई – उपजिल्हाधिकारी डव्हेळे

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

तुळजापूर ‘तालुक्यासाठी’ प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; उमेदवारांवर दाखल गुन्ह्यांचे तीन वेळा प्रसिध्दीकरण बंधनकारक अन्यथा कारवाई – उपजिल्हाधिकारी डव्हेळे

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार डव्हेळे यांनी दिली. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे दाखल असतील तर त्यांना त्या गुन्ह्याचे तीन वेळा प्रसिध्दी करण करणे बंधनकारक असल्याचे ही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारी जाहीर झाली. 241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठीची तयारी बाबत निवडणूक अधिकारी डव्हेळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी तहसीलदार अरविंद बोळंगे, नायब तहसीलदार संतोष पाटील , पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख ,पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर उपस्थित होते.

पुढे बोलताना म्हणाले, आचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी राजकीय कार्यालय, खाजगी जागा आणि शासकीय ठिकाणे या ठिकाणी असलेले राजकीय फोटो, बॅनर हे येत्या 48 तासात काढून घ्यावेत असे आवाहन केले.या मतदारसंघात 21 स्थिर सर्वेक्षण पथके तसेच एफ एस टी प्रभारी पथके 12 आणि चित्रीकरण 3 व चित्रीकरण पडताळणी 6 पथके फिरतीवर राहतील, कुठे काही घडल्यास शंभर मिनिटाच्या आत कारवाई होईल. उमेदवारी जाहीर होण्यापू्वी काही संभाव्य उमेदवार वाढदिवस, मेळावे साजरे करण्याचे कार्यक्रम होतात त्यावर वॉच राहणार आहे.
मतदारसंघात एस एस टी चेक नाके लावत आहोत, तपासणी व्हावी, स्थिर पथक चोवीस तास वाहने तपासतील, अधिकारी, पोलीस व कर्मचारी असतील.सभेसाठी परवानगी साठी उमेदवार सुविधा या ॲप मध्ये परवानगी अर्ज करता येईल, या मतदार संघात जास्त सभेची ठिकाणे असल्याने व्हिडिओ सर्वेलांस चार टीम लावणार आहोत.40 लाखाची उमेदवाराला खर्चाची मर्यादा असून खर्च तपासणीसाठी अर्थ खात्याचा अधिकारी यांची टीम असेल, उमेदवारांवर गुन्हे दाखल असतील तर ते तीन वेळेस जाहीर केले पाहिजे. ते प्रसिध्दीकरण चार दिवसांच्या फरकाने करायचा आहे. शेवटचा प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी प्रसिद्ध केले पाहिजे हे बंधनकारक आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हेळे,तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अरविंद बोळंगे,पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अमोल ताकभाते,नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार हे असतील

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात पुरुष – व स्त्री मतदार संख्या

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात पुरुष -200218
स्त्री-1804444
इतर – 7.,एकूण – 381285 इतकी संख्या आहे.,सैन्य दलातील मतदान
पुरुष -599 .,स्त्री-17 ,तालुक्यात अपंग मतदार संख्या-3832 इतके आहे.,असे एकूण मिळून 616 आहेत.,मतदार केंद्राची संख्या-410

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे