लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक तुळजापूर येथे संपन्न
Post-गणेश खबोले

तुळजापुर-प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे दि.११ रोजी पार पडली.
प्रहार जनशक्ती पक्ष व दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या आदेशानुसार प्रहार जनशक्ती धाराशिव जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली,जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड यांच्या उपस्थितीत ही आढावा बैठक संपन्न झाली.
लोकसभा निवडणुकीत महायुतीतील पक्षानी प्रहार जनशक्ती पक्ष यांना योग्य तो सन्मान दिला नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरवू व त्यांना बहुमताने निवडून आणू असा निराधार यावेळी करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे,उपाध्यक्ष दयानंद राठोड,लोहारा तालुकाध्यक्ष किशोर भालेराव,परंडा तालुकाध्यक्ष आप्पा तरटे,तालुका उपाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष औदुंबर ठोंगे,महिला जिल्हा संपर्कप्रमुख राजकन्या जावळे यांच्या सह सर्व तालुक्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष,पदाधिकारी उपस्थित होते.