‘उत्पादन शुल्क’चा छापा,६८ हजार ९५५ रुपयाचा मुद्देमाल जप्त -निरीक्षक सुनील कांबळे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

‘उत्पादन शुल्क’चा छापा,६८ हजार ९५५ रुपयाचा मुद्देमाल जप्त -निरीक्षक सुनील कांबळे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
विविध विदेशी कंपनीची बंदी असलेली दारू अवैधरित्या लेबल बदलून राहात्या घरी विक्री करीता बाळगल्या प्रकरणी एकास धाराशिव तालुक्यातील महादेववाडी येथून अटक करण्यात आली. सदरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी टाकलेल्या छाप्यात 68 हजार 955 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की धाराशिव तालुक्यातील महादेववाडी येथे अर्जुन शिवाजी लबडे हे राहत्या घरात अवैधरित्या गोवा राज्य निर्मिती व गोवा राज्य विक्रीसाठी असलेली विदेशी दारू महाराष्ट्र नावाने टोपण लेबल बदलून विक्री करीत होता. ही माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने सापळा रचून अचानक धाड टाकली व अर्जुन लबडे यास यावेळी ताब्यात घेतले असता विविध नामांकित कंपन्यांच्या सुमारे 68 हजार 955 रुपये किंमतीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.त्यानंतर संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे सुधारित अधिनियम 2005 चे कलम 65, ( अ, ई) 81, 83, 90, 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक पवन मुळे, दुय्यम निरीक्षक सुनील कांबळे, प्रभारी निरीक्षक विजय राठोड, दुय्यम निरीक्षक पी.जी. कदम, महेश कंकाळ, आर. आर. गिरी, जवान अभिजीत बोंगाणे, विनोद हजारे, लहू डोंबाळे, यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक सुनील कांबळे हे करीत आहेत.