
लोहारा-प्रतिनिधी
सामाजिक वनीकरण उमरगा यांच्या वतीने वन महोत्सव 2024 अंतर्गत अमृत वृक्ष आपल्या दारी “एक पेड माँ के नाम” अंतर्गत लोहारा तहसील कार्यालय येथे रोपे विक्रीचा स्टॉल लावण्यात आला.
या स्टॉल उदघाटन नायब तहसीलदार सुजाता हंकारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वड,पिंपळ,सिताफळ,करवंद,आवळा,अशोक,बदाम,पेरू, लिंबू,सागवन,करंज,शिशु इत्यादी रोपे नागरिकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आली होती.यावेळी तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी रोप घेऊन आपला सहभाग नोंदवला.यावेळी गटविकास अधिकारी श्रीमती शितल खिंडे यांनीही रोप विकत घेत
वृक्षा विषयी माहिती सांगितली.
सदर कार्यक्रम सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र अधिकारी उमरगा एन एस पसरंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न करण्यात आला.यावेळी वनपरिमंडळ अधिकारी लोहारा सुर्यकांत माळी,वनरक्षक लोहारा विष्णू कातकडे, बलीराम गायकवाड यांच्या सह उमरगा लोहारा सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.