न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

आगामी सण उत्सव निमित्त पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार अध्यक्षतेखाली बैठक

Post-गणेश खबोले

 

लोहारा-प्रतिनिधी

पोलीस स्टेशन लोहारा येथे उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली.बैठकी दरम्यान आगामी काळातील सण उत्सव,पोळा,गणेशोत्सव,गौरी पूजन व इतर सणउत्सव साजरे होणार असून हे सर्व सण शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता तसेच कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना न दुखावता साजरे करावे तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गावातील धार्मिक प्रार्थना स्थळे,मंदिर,मस्जिद,दर्गा,बुध्दविहार,महापुरुषांचे पुतळे यांना बीट अंमलदर व दुय्यम अधिकारी तसेच सर्व पोलीस पाटील यांनी आपापल्या गावातील प्रार्थना स्थळे मंदिर थोर महापुरुषांचे पुतळे यांना भेटी द्यावेत व भेटीचे फोटो ग्रुप वर टाकावेत तसेच गावातील निदर्शनास येणारी माहिती लागलीच पोलिसांना कळवावे याबाबत मार्गदर्शन केले
सदर बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव शेलार,पोलीस निरीक्षक चिंतले,पोलीस कॉन्स्टेबल माधव कोळी व लोहारा तालुक्यातील २३ पोलीस पाटील उपस्थित होते

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे