वागदरीत बुद्ध जयंतीनिमित्त पंचशील ध्वजारोहण

वागदरीत बुद्ध जयंतीनिमित्त पंचशील ध्वजारोहण
वागदरी /न्यूज सिक्सर
विश्वशांती दुत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त वागदरी ता.तुळजापूर येथील पंचशील बुध्द विहाराच्या प्रांगणात सामाजिक कार्यकर्ते देवानंद बनसोडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करून तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना आभिवादन करण्यात आले.
प्रारंभी पंचशील बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष नागनाथ बनसोडे, सचिव एस.के. गायकवाड, ग्रा.प.सदस्य अंकुल वाघमारे, गुनाबाई बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते देवानंद बनसोडे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून सामूहिकरित्या बुद्ध वंदना घेण्यात आली.
यावेळी सुर्यकांत वाघमारे, हणमंत वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, अनिल वाघमारे, महादेव वाघमारे, शिवाजी वाघमारे,रामस्वामी वाघमारे, दत्ता बनसोडे,सहादेव वाघमारे,नितीन बनसोडे, सह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.