तुळजापुर खुर्द येथील तुळजाई मंडळाचा विना वर्गणी गणेशउत्सव कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी ॲड बालाजी देशमाने तर उपाध्यक्षपदी नान भोजने यांचा निवड

तुळजापुर खुर्द येथील तुळजाई मंडळाचा विना वर्गणी गणेशउत्सव कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी ॲड बालाजी देशमाने तर उपाध्यक्षपदी नान भोजने यांचा निवड
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर खुर्द येथील तुळजाई सांस्कृतीक व क्रीडा मंडळाची गणेशोत्सव २०२४ साठी मंडळाचे जेष्ठ सभासद भोजने दुर्वास भगवान यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सांस्कृ तीक व सामाजीक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले असुन सदरील सर्व कार्यक्रम मंडळाच्या प्रथेप्रमाणे विनावर्गनी मंडळाच्या सदस्यांच्या मदतीतुनच आयोजीत करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले यावर्षी प्रति वर्षाप्रमाणे रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, किर्तनसेवा, भारुडसेवा, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजन, नागरिकांसाठी सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन, तसेच पशुवैद्यकिय शिबीर, महिलांसाठी खास मोदक स्पर्धेचे आयोजन यावर्षी प्रथमच केले जाणार आहे मंडळाचे हे ३६ वे वर्ष आहे.
सभेच्या सुरवातीस २०२४ वर्षीच्या गणेश उत्सव समितीचे गठण करण्यात आले यामध्ये अध्यक्षपदी ॲड. बालाजी चंद्रकांत देशमाने यांची निवड करण्यात आली उर्वरीत कार्यकरणीमध्ये उपाध्यक्ष नाना भोजने सचिवपदी विकास भोजने तर कोषाध्यक्षपदी राम ठेले यांची नियुक्ती करण्यात आली कार्यकारणी सदस्यम्हणून साबळे हाणमंत व शेख अलीम यांची निवड सर्वानुमते करण्यात आली या सभेस मंडळाचे जेष्ठ सदस्य ताटे सर नगरसेवक पंडितराव जगदाळे, राजाभाऊ देशमाने तुळजाई मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अदिनाथ ठेले उपाध्यक्ष संजय नाईक सचिव संजय ढवळे सचिन राऊतसर, प्रा निलेश एकदंते सर, धनंजय कुंभार सर, डॉ गोपिनाथ भोजने, संजय व्हटकर सर, प्रा संतोष एकदंते सर, मकसुद भाई शेख, संजय देशमाने,प्रमोद क्षीरसागर व मंडळाचे बहुतांश सभासद हजर होते.