मतदारसंघातील सर्वच समाजघटकांच्या उन्नतीसाठी सदैव कटिबध्द- आ.ज्ञानराज चौगुले
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनीधी
लोहारा तालुक्यातील जेवळी उत्तर येथे मुजावर गल्लीतील मस्जीदीस संरक्षक भिंत बांधकाम करण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातुन अल्पसंख्यांक बहुल विकास कार्यक्रम निधी अंतर्गत सुमारे २० लक्ष रू. निधी मंजुर करण्यात आला होता. शुक्रवार दि.९ ऑगस्ट रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या शुभहस्ते या कामाचा भुमीपुजन सोहळा संपन्न झाला. मतदारसंघातील सर्वच समाजघटकांना सोबत घेऊन त्यांच्या विविध समस्या राज्य शासनाकडे मांडणे व शासनाच्या माध्यमातुन त्यांना विविध सोयीसुविधा पुरविण्यासाठी मागील १५ वर्षांपासुन आपण काम करीत असुन दोन्ही तालुक्यातील अधिकाधिक गावामध्ये मुस्लीम समाजबांधवांच्या मागणीनुसार कब्रस्तान संरक्षक भिंती, मस्जीद संरक्षक भिंती, कब्रस्तानचे रस्ते, इदगाह मैदानाचा विकास आदी कामे मंजुर केली आहेत. कालच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती शासनाने राज्यातील अल्पसंख्यांक, मुस्लीम समाजातील तरूणांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळावी यासाठी अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला असुन येणाऱ्या काळात याचा राज्यातील अल्पंख्यांक बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी बोलताना आ.ज्ञानराज चौगुले यांनी केले. या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, सरपंच महानंदाताई मोहन पणुरे, उपसरपंच बसवराज कारभारी, ग्रामविकास अधिकारी आर. एल.वाघमारे, परवेज तांबोळी, बाबा शेख, गणीसाहेब पठाण, नजीर मुजावर, इस्माईल शेख, नसरोददीन शेख, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.