देवानंद रोचकरींच्या वाढदिवसाचे जोरदार मार्केटिंग ; यंदाचे नवीन ‘स्लोगन “भावी आमदार’ सर्वांचे वेधतेय लक्ष
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

देवानंद रोचकरींच्या वाढदिवसाचे जोरदार मार्केटिंग ; यंदाचे नवीन ‘स्लोगन “भावी आमदार’ सर्वांचे वेधतेय लक्ष
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सध्या देवानंद रोचकरी यांच्याच नावाची चर्चा ऐकण्यास मिळत आहे. तुळजापूर तालुक्यातील मतदार संघासह शहरी भागात जुन्या बसस्थानकाच्या परिसरासह एक पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ते म्हणजे देवानंद रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावर लिहिलेले स्लोगन.
हे “स्लोगन भावी आमदार “ ६१ वर्षाचा प्रवास, लोकसेवेचा, निर्धार लढण्याचा”.
रोचकरी यांचा ६१ वा वाढदिवस नुकताच साजरा झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुका आणि शहरी भागात त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसाची जोरदार होर्डिंग डिजीटल लावले होते . प्रत्येकानी आपापल्या पद्धतीने लाडक्या भावी आमदाराचे पोस्टर लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अनेक कार्यकर्ते यांनी आपल्या कारवर देवराज यांचे पोस्टर लावून आपले प्रेम व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.या विधानसभेसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणखी संचारला आहे. यंदा कोणत्याही पक्षाने तिकीट मिळाल्यास किंवा देवराज मित्र मंडळाच्या वतीने विधानसभा निवडणूक रोचकरी हेच लढवतील असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. त्यादृष्टीने भाऊयांच्या विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.