ब्रेकिंग
श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानच्या नुतन तहसिलदार यांचा भोपे पुजारी मंडळाकडून सत्कार
Post-गणेश खबोले

तुळजापूर -प्रतिनिधी
श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानचे सोमनाथ वाडकर (माळी) तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन या पदावरून लातूर येथील देवणी तालुक्याचे तहसिलदार म्हणून नुकतीच बदली झाली.त्यांच्या ठिकाणी मंदिर संस्थानच्या नुतन व्यवस्थापक प्रशासन तथा तहसिलदार पदी श्रीमती माया माने यांची निवड झाल्याने श्री तुळजा भवानी मातेचे भोपे पुजारी मंडळाच्यावतीने अध्यक्ष अमरराजे कदम व प्रशांत सोंजी यांनी सत्कार करून देविच्या व मंदिराच्या रूढीपरंपराबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.भाविकांनी अर्पण केलेल्या वस्तू देविपर्यंत जाव्यात तसेच भाविकांना प्राधान्य देवून त्यांच्या भावनेचा व श्रद्धेचा विचार मंदिर संस्थानने करावा अशी ही विनंती भोपे पुजारी मंडळाने यावेळी केली.