तुळजापूर येथील नवीन बस स्थानक येथे महिलेचा विनयभंग करणाऱ्यास दोन वर्षाचा तुरुंगवास व पाच हजार रुपये दंड

तुळजापूर येथील नवीन बस स्थानक येथे महिलेचा विनयभंग करणाऱ्यास दोन वर्षाचा तुरुंगवास व पाच हजार रुपये दंड
तुळजापूर /न्यूज सिक्सर
तुळजापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री एम एम निकम यांनी दिनांक 01/04/ 2023 रोजी आरोपी बिजलीसिंग लालमोहनसिंग वय 54वर्षे राहणार सुजलालपुर ता. ढोलपूर जि. मुज्जाफापुर राज्य बिहार यास नवीन बस स्थानक तुळजापूर येथे महिलेचा विनयभंग केल्याची कारणावरून दोषी धरून दोन वर्षाचा तुरुंगवास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
यात ज्यादा हकिकत अशी की, यातील पीडितां ही दिनांक 4 /10 /2019 रोजी सायंकाळी तिच्या कुटुंबासह तुळजापूर येथील देवीचे दर्शनासाठी आलेली होती. गावी परत जात असताना ती व तिची बहीण तुळजापूर येथील नवीन बस स्थानक येथील सार्वजनिक सुलभ सौचालयाचा वापर कराव्यास गेलेले होते. सुलभ सौच्याल्यातून परत येत असताना आरोपी हा सदर सुलभ सौचालयावर काउंटरवर पैसे येण्याकरिता बसलेला होता. सुलभ शौचालयाचा वापर केल्यानंतर आरोपीने फिर्यादी हिस पैश्याची मागणी केली व तू कुठली आहेस असे विचारणा केली असता फिर्यादी पीडित महिलेने ती लातूरची आहे असे म्हटल्यानंतर आरोपीने तिचे गालाला वाईट उद्देशाने स्पर्श करून पैसे राहू दे असे म्हणाला त्यामुळे फिर्यादीस मनाला लज्जा वाटली. त्यामूळे तिने सदर घटनेबाबत फिर्यादीने तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गु र नंबर 356/2019भा द वी कलम 354 प्रमाणे विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांनी केला. तपासांती पुरावा उपलब्ध झालेने त्यांनी आरोपीविरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. माननीय न्यायालयात फिर्यादीचा पुरावा व इतर साक्षीदारांची तोंडी जबाब व तपासाचे कागदपत्र व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय न्यायालयाने आरोपीस सदर गुन्ह्यामध्ये दोन वर्षाचा साधा तुरुंगवास व पाच हजार रुपये दंड ची शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील श्री अमोगसिद्ध कोरे यांनी काम पाहिले. तर कोर्ट पैरवी म्हणून पोलिस अंमलदार श्री लक्ष्मण सुरवसे यांनी मदत केली.