न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

चोवीस वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र, शाळा पुन्हा भरली….!

Post-गणेश खबोले

 

मुरूम-प्रतिनिधी

 

मुरूम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातील सन २०००-२००१ मधील दहावी विद्यार्थ्यांची दि.१२ मे वार रविवार रोजी ” स्नेह मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा नगर शिक्षण विकास मंडळ मुरूम अध्यक्ष बापूराव पाटील यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून नगर शिक्षण विकास मंडळ सचिव व्यंकट जाधव,माजी नगराध्यक्ष रशीद शेख, सोसायटी चेअरमन दत्ता चटगे,गोविंद पाटील यांची उपस्थिती होती. जाफर मोमीन,अप्पू मुदकण्णा,अभिजित कुलकर्णी, आप्पासाहेब बिराजदार आदींच्या पुढाकाराने तब्बल चोवीस वर्षांनी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा शाळा भरवली, आणि विद्यार्थी दसेतील आठवणींना उजाळा दिला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, विद्येची देवता सरवस्ती पूजन संपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा,उपस्थित मान्यवरांचा शाल,फेटा, सन्माचिन्ह देऊन येतोचित्त सत्कार केला. याप्रसंगी दिवंगत शिक्षक व विद्यार्थी मित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रगीताने पुन्हा एकदा शाळा भरवून जुन्या आठवणींच्या गप्पा रंगल्या.गुरुजनांनी, विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मित्र- मैत्रिणी एकमेकींना अनेक वर्षांनी भेटून सुख:दुःखाच्या चर्चा रंगल्या होत्या. स्नेहभोजनाने पुरण-पोळी,आमरस,भजी,पापड्या वर ताव मारून स्नेह मेळाव्याचे सांगता संपन्न झाले.शांत कोरे,कल्याणी कारडामे,विशाल मुरूमकर,संतोष तगरखेडे, शिवराम जाधव,रियाज पटेल,पवन स्वामी,वर्षाराणी खुणे,अन्नपूर्णा खजुरेकर,उमादेवी सगरे,साधना जोशी,पूनम कांबळे,प्रियंका डोंगरे,केतकी पापळकर, पुष्पावती शेळके आदीसह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेळके,प्रास्ताविक डॉ.सागर काबरा तर आभार अभिजित कुलकर्णी यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे