शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी यासाठी स्वराज पक्षाचे रस्ता रोको आंदोलन
Post-गणेश खबोले

लोहारा प्रतिनिधी
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने लोहारा येथे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तसेच निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी रास्ता रोको आंदोलन शुक्रवारी लोहारा रोड येथे स्वराज्य चे जिल्हा उपाध्यक्ष महेश गोरे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरसगट कर्जमाफी करण्यात यावी,शेतकऱ्याला शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे गेल्या काही वर्षात 50 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपली जिवन यात्रा संपवली आहे, हे महाराष्ट्र राज्याला शोभनारे नक्कीच नाही,
शेतकरीआत्महत्या रोखण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना बी बियाणे खते, याचे वाटप करण्यात यावे, तसेच शेतकऱ्यांना लेखी स्वरूपात उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यात यावा, शेतकऱ्यांच्या मुलांना पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत करून नोकरीत जागा आरक्षित करण्यात याव्यात, कृषी विभागात आधुनिकपणा आणून विविध योजना राबवण्यात याव्यात व फळबाग योजनेचे अनुदान देखील वाढवण्यात यावे,
शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी कृषी मालाची व पूरक वस्तूंची आयात बंद करण्यात यावी.
अन्यथा राज्यभरातील शेतकऱ्यांना एकत्र करून मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल , असा इशारा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने देण्यात आला, यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष जिल्हा उपाध्यक्ष महेश गोरे,तालुका उपाध्यक्ष तानाजी पाटील,प्रशांत थोरात,बळी गोरे,तुळशीदास पवार,शेतकरी युवराज तोडकरी,शिवाजी लकडे,निशिकांत कांबळे,संजय मुरटे,देविदास बिराजदार,मुरलीधर मोरे,श्रीकृष्ण गंगणे,संजय माने,अरुण मोरे,रंगनाथ तोडकरी,ईश्वर मोरे,प्रभाकर मोरे,राम सूर्यवंशी आदी शेतकरी उपस्थित होते यावेळी लोहारा नायब तहसीलदार नाना मोरे,नरसिंह ढवळे यांना निवेदन देऊन आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आले, यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकल्लारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे, पोलीस अंमलदार माधव कोळी,आकाश भोसले,किशोर शेवाळे, आदी बंदोबस्ताला होते.