
लोहारा-प्रतिनिधी
केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त असणाऱ्या घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना यशवंतराव चव्हाण आवास योजना मोदी आवास योजना शबरी आवास योजना या सर्व योजना करिता सद्यस्थितीत दिले जाणारे अनुदान हे ग्रामीण भागाकरिता १ लाख २० हजार व शहरी भागाकरिता २ लाख ४०हजार याप्रमाणे देण्यात येते.
परंतु आजच्या महागाईच्या काळामध्ये यामध्ये एवढ्या कमी प्रमाणाच्या निधीमध्ये गोरगरिबांची घरकुल योजना कशी पूर्ण होणार त्यामुळे वरील सर्व योजनांकरिता केंद्रशासन व महाराष्ट्र शासन यांनी अनुदान मर्यादा वाढवून ग्रामीण व शहरी सरसगट दहा लाख रुपये याप्रमाणे अनुदान मर्यादा वाढवून देण्यात यावी याकरिता आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा नगीनाताई सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या आदेशानुसार लोहारा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन दि.११ जुलै रोजी करण्यात आले.
यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण भाऊ क्षीरसागर,राज्य सल्लागार अजय भाऊ कांबळे,मृणाल भाऊ कांबळे, विजय कांबळे,जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ हनुमंते,जिल्हा कोर कमिटी अध्यक्ष दीपक रोडगे,लोहारा तालुका अध्यक्ष नितीन भाऊ रोडगे शहर अध्यक्ष अक्षय सगट,कुंडलिक भाऊ भोवळ,उमेश देडे,इत्यादी उपस्थित होते.