न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

काँग्रेस मधून युवक नेते ऋषिकेश मगर यांना तालुकाध्यक्ष पदी वर्णी

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

काँग्रेस मधून युवक नेते ऋषिकेश मगर यांना तालुकाध्यक्ष पदी वर्णी

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी युवक नेते ऋषिकेश अशोकराव मगर यांची निवड करण्यात यावी अशी भावना काँग्रेस पदाधिकारी आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्त्यांमध्ये आहे. या महिन्याभरामध्ये नवीन तालुकाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया होईल असा अंदाज आहे. पक्षश्रेष्ठी आणि पक्ष नेते कोणाच्या पदरात तालुका अध्यक्ष पद टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुळजापूर शहराच्या काँग्रेस राजकारणामध्ये ऋषिकेश मगर व अमोल कुतवळ ही दोन नाव मागील पाच वर्षांमध्ये प्रकाश झोकात आलेली आहेत दोघेही काँग्रेसची सत्ता नगरपरिषद आणि इतर संस्थांवर आणण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. मर्यादित शक्ती आणि काँग्रेसचा तुळजापूर शहर आणि तालुक्यातील जनाधार याच्या जोरावर त्यांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे

राजकीय दृष्ट्या काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून तुळजापूर तालुका प्रसिद्ध आहे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, दिवंगत माजी आमदार सि . ना. आलुरे गुरुजी, माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्यासारखे मोठे नेते या पक्षांमध्ये कायम तालुक्यावर सत्ता गाजवत आलेले आहेत. सुमारे वीस वर्ष मधुकरराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यावर आपले वर्चस्व राखून आहेत. आजस्थितीला देखील मधुकर चव्हाण यांचे वर्चस्व मतदार संघावर कायम आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे देखील तुळजापूर शहरांमध्ये असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून देखील पक्षाला मोठे पाठबळ आहे. यापूर्वी माझी नगरसेवक अमर मगर हे अनेक वर्ष तालुकाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांचे वडील अशोकराव मगर हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत तुळजाभवानी साखर कारखाना आणि वेगवेगळ्या शासकीय पदावर त्यांनी काम केले आहे तुळजापूर शहराचे प्रदीर्घकाळ नगरसेवक म्हणून त्यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केलेले आहे. काँग्रेस पक्षाचा वारसा कुटुंबामध्ये मोठा आहे त्याचबरोबर ऋषिकेश मगर यांनी व्यक्तिगत काँग्रेस पक्षामध्ये आपला मोठा जनसंपर्क वाढवून कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन केला आहे त्याच्या बळावर कार्यकर्त्यांनी त्यांना तालुकाध्यक्ष करण्यासाठी मानसिकता निर्माण केलेली आहे. आपल्याला सदैव राजकारणामध्ये मदतीचा हात देणारा युवक नेता अशी त्यांची प्रतिमा काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये अनेक वर्षांपासून आहे. काँग्रेस पक्षाने त्याला तालुकाध्यक्ष पद दिले तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी ऋषिकेश मगर यांच्याकडून खात्रीलायक आणि चांगले काम उभे राहील असा जाणकारांचा विश्वास आहे. राजकीय परिस्थितीमध्ये कोणत्या वेळी कोणती भूमिका घेतली पाहिजे याचे चांगले ज्ञान त्यांना अवगत झालेले आहे.

तुळजापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर तुळजापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये बराच बदल झाला आहे राजकीय समीकरण बदलले आहेत मधुकरराव चव्हाण यांच्यावर श्रद्धा असणारे कार्यकर्ते आमदार पाटील यांच्या बाजूने मागील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर गेलेले आहेत. याशिवाय सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशा वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडल्यामुळे तालुक्याच्या राजकारणामध्ये भविष्यात काय चमत्कार घडणारे या सर्वांचे लक्ष लागले आहे. देवानंद रोचकरी, महेंद्र दुर्गुडे, अशोक जगदाळे पुन्हा एकदा हे राजकीय नेते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी करीत आहेत. काँग्रेसकडून मधुकरराव चव्हाण आणि धीरज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे त्यांच्या पाठोपाठ ऋषिकेश मगर यांनी देखील विधानसभा लढवण्यास हरकत नाही असा मतप्रवाह आहे. तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ऋषिकेश मगर यांनी दिलेला खंबीर लढा आणि निवडून आलेल्या जागा लक्षात घेता ऋषिकेश मगर यांच्या बाजूने कार्यकर्त्यांची बळ निर्माण झालेले आहे त्यांची भावना अद्याप उघड झालेली नाही परंतु याविषयी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांची भूमिका निर्णायक राहणार आहे.

तुळजापूर नगरपरिषद, नगर परिषद नळदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायती या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने युवक नेते च मदतीने मागील निवडणुकांमध्ये लढत दिलेली आहे. यामध्ये कार्यकर्त्यांना मदत करणे आणि त्यांच्या अडचणीमध्ये त्यांना सहकार्य करणे याविषयी काँग्रेस राजकारणामध्ये संवेदनशीलता निर्माण झाली आहे. प्रमुख नेत्याचे मत वेगळे आणि गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मत वेगळे अशी काँग्रेस पक्षाची स्थिती आज तुळजापूर तालुक्यात आहे. देशपातळीवर राहुल गांधी यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड झाली या विषयाच्या अनुषंगाने तुळजापूर शहर परिसरात मोठे फ्लेक्स लावून राहुल गांधी यांचे अभिनंदन अमोल कुतवळ यांनी केले या फ्लेक्स लावण्याच्या कृतीचे काँग्रेस पक्षाच्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले आहे.

मागील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने फारसे पाठबळ न देता देखील काँग्रेस पक्षाच्या मोठ्या गावच्या ग्रामपंचायती गाव पातळीवरील नेत्यांनी निवडून आणल्या तेव्हा काँग्रेसची ताकद तालुक्यात किती आहे हे दिसून आलेले आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा मतदार आणि पक्षासाठी काम करणारे ग्रामीण भागातील कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणावर आहेत याची देखील जाणीव झालेली आहे. राजकारणातील जनरेशन बदलण्याची प्रक्रिया तालुक्यात होत आहे याचा विचार करतात आगामी अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षामध्ये अनेक जण दावेदार असू शकतात परंतु ऋषिकेश मगर हे त्यातील प्रमुख दावेदार आहेत हे नक्कीच.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे