अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर घ्या; तुळजापूर तहसिल कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण !
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी,तुळजापूर

अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर घ्या; तुळजापूर तहसिल कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण !
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जाहिर पाठिंबा..! – विजय क्षिरसागरसर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर घेणेसाठी दिनांक ०७/०४/२०२४ रोजी पासुन तहसील कार्यालय, तुळजापूर समोर बेमुदत अमरण उपोषण चालू
अमरण उपोषणाकरिता अर्ज सादर केला आहे की, त्यांचे वडील कै. बलभीम पंढरी डोलारे हे तहसील कार्यालय, तुळजापूर येथे कोतवाल या पदावर कार्यरत असताना दिनांक ०१/०९/२०२१ रोजी मयत झालेले आहेत. एक त्यांचा मोठा मुलगा असुन सध्या तो सुशिक्षीत बेरोजगार आहे. त्यांची आई वयोवृध्द असून आईला उच्च रक्तदाब व मधुमेहाचा आजार असल्यामुळे घरची सर्वस्वी जबाबदारी मुलावरच आहे. कुटुंबात कोणीही कमावता नसल्याने तसेच जीवन जगण्यासाठी इतर कोणतेही साधन नसल्यामुळे त्याला नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे.
सदंर्भ क्रं. १. च्या शासन निर्णयान्वये कोतवाल यांचे वारस संदर्भ क्रं. २ व ३ यांना मा. तहसीलदार , उमरगा यांनी त्यांचे वडील सेवेत कार्यरत असतना निधन झाल्यावर त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसांना अनुकंपातत्वावर कोतवाल या पदावर रिक्त जागी नियुक्ती दिलेली आहे.
ते यापुर्वी अनेकवेळा विनंती अर्ज सादर करुन देखील त्यांच्या अर्जाचा आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा विचार केला गेला नाही. याकारणामुळे ते नाईलाजास्तव तहसील कार्यालय, तुळजापूर येथे बेमुदत अमरण उपोषण दिनांक ०५/०४/२०२४ रोजी पासुन करत आहेत.
तरी वरिष्ठ अधिकारी सहानुभुतीपूर्वक विचार करून त्यांना न्याय द्यावा न्याय मिळेपर्यंत ते उपोषण मागे घेणार नाहीत. उपोषणकर्ते अतुल बलभीम डोलारे यांना लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात आला.त्यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.