
लोहारा / प्रतिनिधी
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर लोहारा पोलिस ठाण्याच्या वतीने दि.१६ रोजी रूट मार्च घेण्यात आला.पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,
उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या सूचनेनुसार लोहारा पोलिस निरीक्षक अजितकुमार चिंतले यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात कायदा व सुव्यवस्थता राहावी.सर्व धार्मिय सण उत्साहात साजरा व्हावा.यासाठी लोहारा पोलिस प्रशासनाच्या वतीने शांतता बैठक ही घेण्यात आली होती. पोलीस स्टेशन ते महात्मा फुले चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते जेवळी रोड लक्ष्मी भांडे स्टोअर्स ते ईदगहा मजीद,जगदंबा मंदिर,आझाद चौक,शिव नगर ते रजिस्ट्री ऑफिस,बस स्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक असा रूट मार्च घेण्यात आला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक केंद्रे,पोह/कांतु राठोड,हनुमंत पापुलवार,पोना/किशोर शेवाळे,विजय कोळी,राठोड,फुलमाळी,तिघाडे,पोकॉ/माधव कोळी,नागेश रजपुत,जाधव,मोरे,तांबे,घोडके यांच्यासह
पोलीस अधिकारी,पोलीस अंमलदार,होमगार्ड, मोबाईल वाहन आदी रूट मार्च मध्ये सामील होते.