शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर विजयी सौ.अर्चनाताई पाटील यांना अंडर करंटचा झटका !

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर विजयी
सौ.अर्चनाताई पाटील यांना
अंडर करंटचा झटका !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय पंडित देखील जागांचे भाकीत व्यक्त करायला घाबरत होते. यावेळी ना लाट आहे, ना वारे आहे. यावेळची निवडणूक मतदारराजांच्या हातात होती. म्हणून तर अंडर करंट आहे असे म्हणतात. ग्राउंडवर जाऊन लोकांशी निवडणुकी विषयी बोलताना डोळे विस्फारून जातात. दहा वर्षापूर्वीचे दिवस वेगळे होते. यावेळी परिस्थिती बदल चालली आहे.
या सुजान पत्रकारांनी बातमी मागची बातमी दाखवल्यामुळे लोकांना सत्य एका क्लिकवर कळायला लागले. . अशी प्रकरणे बरोबर दाबली गेली असती. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात ठाण मांडून बसावे लागत आहे. यापूर्वी अशी वेळ कोणत्याच पंतप्रधानावर आलेली नहोतो
राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तीन पक्षात मोठमोठे नेते आहेत. राज ठाकरे सारखा गर्दी खेचणारा वक्ता आहे तरीही मोदी आणि शहा यांनाच किल्ला लढवावा लागला आहे. महाराष्ट्रात किल्ला लढवता आला नाही
भाषणातील मुद्दे देखील तेच तेच जेते.
फडणवीस मधूनच कोरोना लसीचा मुद्दा काढतात. हा मुद्दा खरं म्हणजे निवडणुकीत लागूच होत नहोता. सर्वसामान्यांचे प्रश्न वेगळे आहेत. ग्रामीण भागातील लोकांना राम मंदिराचा नक्की अभिमान आहे. परंतु राज्यातील लोक त्याचे श्रेय भाजपला देत नाहीत हे भाजपचे मोठे दुःख आहे.
महाराष्ट्रात भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन पक्ष फोडून सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना फोडून भाजपने सरकार स्थापन केले. इथपर्यंत लोकांना काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु शिवसेना पक्ष,नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर जनता खऱ्या अर्थाने भडकली. तीच गोष्ट अजित पवार यांच्या बाबतीत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाही सभेत भ्रष्टाचारावर बोलू शकले नाहीत कारण, ज्यांच्यावर त्यांनी मागच्या काळात टीका केली होती ते सगळे नेते आज त्यांच्या प्रचासभेत त्यांच्या शेजारी बसलेले दिसत होते. बीड व उस्मानाबाद मध्ये जरांगे फॅक्टर चालला म्हणून पंकजा मुंडे व सौ.अर्चनाताई राणाजगदीशसिंह पाटील यांचा पराभव झाला
या निवडणुकीत ज्यांचा आत्मविश्वास गगनाला भिडला आहे असे एकच नेते आहेत ते म्हणजे उद्धव ठाकरे. काँग्रेस, शरद पवार यांना सध्या जो प्रतिसाद मिळला आहे तो यापूर्वी कोणालाच मिळालेला नाही. त्यांची भाषणं, त्यातील मुद्दे, मोदी-शहा यांना थेट अंगावर घेण्याची त्यांची पद्धत लोकांना अपील होत आहे. त्यांच्याकडे गमावण्यासाठी काहीच नव्हते त्यामुळे ही निवडणूक उद्धव , शरद पवार यांच्यासाठी फ्री हिटच्या चेंडूसारखी झाली. जय भवानी च्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना नोटीस देऊन नो बॉल टाकला. त्याचा पुरेपुर फायदा उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत घेतला. या निवडणुकीतील लोकांचे जनमत सांगणे कठीण आहे. पारावर बसलेला ग्रामीण मतदार कांदा निर्यात बंदी, शेतीपिकाचे हमीभाव, कृषी यंत्रावरील जीएसटी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील खनिज तेलाचे भाव या विषयावर तासनतास बोलताना दिसत होते.नमो सन्मान मधून मिळणाऱ्या सहा हजारांचं कौतुक कोणालाही नाही. सहा हजार रुपयांपेक्षा शेतकरी दिवसाला फक्त 16 रुपये 66 पैसे मिळतात असं सांगतात. सोशल मीडियाचे पीक डेली दोन जीबी डेटातून घराघरात फोफावले आहे. त्यातूनच अंडर करंट निर्माण झाला आहे. दहा वर्षांपूर्वी जो सोशल मीडिया भाजपला सत्ता सोपान चढण्यासाठी मदत केली होता, तोच सोशल मीडिया आज त्यांचीच पोलखोल करीत. ही निवडणूक अटीतटीचे झाली धाराशिव येथे मतमोजणीला सुरुवात झाली.एकूण 30 फेरीनंतर निकाल घोषित करण्यात आला. या निवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार ओमप्रकाश भूपालसिंह ऊर्फ पवनराजे राजेनिंबाळकर हे 3 लक्ष 29 हजार 846 एवढ्या मताधिकक्याने विजयी झाले.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या उमेदवार सौ अर्चना पाटील यांचा दारून पराभव केला.