
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जेवळी ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यात्रेनिमित्त आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि ९) विविध ठिकाणाहून आलेल्या कलाकारांनी लावणीसह विविध गीतांवर दिलखुचक ठसकेबाज नृत्य सादर करुण उपस्थितांची मने जिंकली
महात्मा बसवेश्वर यात्रेनिमित्त समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संस्कृती नृत्य स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी प्रौढ गटातील वैयक्तिक नृत्य स्पर्धा (स्त्री, पुरुष) पार पडली. या दुसऱ्या दिवशीच्या नृत्य स्पर्धेच उद्घाटन अभियंता अभिषेक शामसुंदर पाटील यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीज महावितरण कंपनीचे निवृत्त उपअभियंता विरपक्ष स्वामी हे होते. यावेळी वायुसेना दलातील निवृत्त अधिकारी श्रीशैल येणेगुरे, पंचायत समितीचे माजी सभापती बुद्धिवंत साखरे, युवा उद्योजक योगीराज सोळशे, अभियंता अभिजित पाटील, धनराज शिंदखेडे, महेश सुरवसे, गणेश कारभारी, बाबा मुल्ला, महादेव सारणे, नागेश करदंटे, वैभव सोळशे, रुपेश जिडगे, राजेंद्र ढोबळे, बालाजी निंगशेट्टी, सुभाष सारणे, अनिल भैरप्पा, शंकर कोराळे, रमेश निंगशेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रौढ गटातील वैयक्तिक नृत्य स्पर्धा (स्त्री, पुरुष) पार पडल्या यात ठिक ठिकाणांहून आलेल्या कलाकारांनी विविध चित्रपट गिते, लावणी, वाघ्या- मुरळी, लोकगिते, शास्त्रीय नृत्यातून एकाहून एक सरस नृत्य आविष्काराचे उत्कृष्ट सादरी करीत प्रेक्षकांना डोलायला लावले.