
लोहारा/प्रतिनिधी
श्री जगतज्योती, क्रांतीसुर्य समतानायक श्री महात्मा बस्वेश्र्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोहारा शहरात जब्बार मुल्ला यांच्या वतीने सामाजिक भावना जपत मोफत रस वाटप करण्यात आले. यावेळी श्री महात्मा बस्वेश्र्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करुण रस वाटपास सुरुवात करण्यात आले. यावेळी भाजपा उमरगा लोहारा विधानसभा प्रमुख राहुल पाटील, शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, शिवसेना नेते राजेंद्र माळी, कृ.उ.बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, शब्बीर गवंडी,
शालेय व्यवस्थापन समिती सभापती के.डी.पाटील, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, ओम कोरे,
हरी लोखंडे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, विनोद मुसांडे, प्राचार्य शहाजी जाधव, सुमित पाटील,
मल्लीनाथ घोंगडे, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, जब्बार मुल्ला, रहेमान उर्फ दादा मुल्ला, खाशिम मुल्ला, आदम मुल्ला, अबुबकर मुल्ला, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.