टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूरच्या विद्यार्थ्यांची वागदरी गावाला भेट

टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूरच्या विद्यार्थ्यांची वागदरी गावाला भेट
वागदरी /न्यूज सिक्सर
टाटा सामाजिक संस्थाच्या तुळजापूर येथील समाजकार्य पदवीच्या(B.sw)विद्यार्थ्यची तुळजापूर तालुक्यातील वागदरी गावाला भेट देवून ग्रामस्थासी साधला विविध विकासात्मक सामाजकार्या विषयी संवाद.
परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्गच्या कार्यक्षेत्रातील वागदरी येथे टाटा सामाजिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी वागदरी गावाला भेट देऊन गावची सविस्तर माहिती घेतली असून लवकरच गावाचा SWOTअनालेसीस करुन गावची क्षमता, कमतरता, संधी, व अडथळे काय आहेत याचा सविस्तर अभ्यास करून आदर्श गाव करण्यासाठीचा एक आराखडा तयार करण्यात येईल. त्या आराखड्यानुसार ग्राम पंचायत गावात विकासात्मक कामे करेल यातून ग्रामसभा बळकटीकरण, लोकसहभाग,वाढून शासनाच्या विविध योजना गावात राबविण्यात येतील व वागदरी गाव एक स्मार्ट गाव म्हणून ओळखले जाईल. असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांनी ग्रामस्था मध्ये निर्माण केला.
यावेळी गावच्या प्रथम नागरीक सरपंच तेजाबाई शिवाजीराव मिटकर,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील उपाध्यक्ष फतेसिंह ठाकूर , ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर पाटील,अंकोल वाघमारे ,गुणाबाई बनसोडे , महादेव बिराजदार,दत्ता सुरवसे सह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते .
याप्रसंगी शिवाजीराव मिटकर गुरुजी यांनी सर्वांचे स्वागत केले व गावाची सविस्तर माहिती दिली तर परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी सन २०२१ पासून परिवर्तन संस्था या गावात विविध विषयांवर काम करत असून भविष्यात विविध उपक्रम या गावात राबवून वागदरी गाव हे महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्यासाठी आपण सर्वातनी प्रयत्न करुया तरी ग्रामस्थानी वेळोवेळी असेच सहकार्य करावे असे आवाहन ही मारूती बनसोडे यांनी केले.
यावेळी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे आनंद भालेराव यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी देशाच्या विविध राज्यातून आलेले एकूण ३२ विद्यार्थी व ग्रामस्थ, महिला, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.