न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

सिंचन प्रकल्प,वैद्यकीय महाविद्यालय,उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा विधिमंडळाचा आवाज उठविला -मा.आ.सुजितसिंह ठाकूर

Post-गणेश खबोले

लोहारा(इकबाल मुल्ला)

तुळजापूर येथे रुपामाता परिवार व उद्योग समूहाच्या वतीने भाजपचे नेते तथा माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांना महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सव कार्यक्रमात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते विधान परिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थापक तथा भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विधिमंडळात व विधिमंडळाच्या बाहेर सतत पाठपुरावा केला असून मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता असल्याचे यावेळी सांगून भव्य सत्कारा बद्दल रूपामाता उद्योग समुहाचे आभार मानले. प्रास्ताविकात आयोजक ॲड.व्यंकटराव गुंड यांनी माजी आ. ठाकूर यांनी सभागृहात धाराशिव जिल्ह्यासाठी हक्काचे पाणी, जलयुक्त शिवार, शेतकरी कर्ज माफी, रेल्वेमार्गासाठी भरीव निधी, इ. विषयांसह जिल्ह्यातील जिव्हाळ्याचे विषय प्रभावीपणे सोडविल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय मैदर्गी तर आभार दत्ता सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील यांनी रुपामाता परिवाराच्या उद्योग समूहामुळे हजारो युवकांना तुळजापूर मतदारसंघात रोजगार उपलब्ध झाल्याचे सांगितले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी राजे चालूक्य पाटील, जेष्ठ नेते ॲड.मिलिंद पाटिल, सुधाकर गुंड, नितिन काळे, ॲड.अनिल काळे, दत्ताभाऊ कुलकर्णी, गुलचंद व्यवहारे, रामदास अण्णा कोळगे, साहेबराव घुगे, प्रभाकर मुळे, दिपक आलूरे, संतोष दादा बोबडे, प्रदीप शिंदे, राजसिंह निंबाळकर, विजय शिंगाडे, दत्ता राजमाने, श्रीमती मीनाजी सोमाजी, महानंदा पैलवान, संगीताताई कदम, बाबुराव पुजारी, विक्रम सुरवसे, भीमाशंकर हासुरे, प्रभाकर मुळे, बाळासाहेब शामराज, इंद्रजीत देवकते, आनंद कंदले, अभिजित काकडे, नारायणजी नन्नावरे, शामराव पेंदे, नागेश नाईक,सचिन पाटील, दत्ता सोनटक्के, प्रदीप शिंदे, सागर पारडे, अमित मोगरकर उद्योग समुहाचे कार्यकारी संचालक ॲड.अजित गुंड, विशाल गुंड शंकर गाडे, प्रेमनाथ पाटील, अँड.शरद गुंड, संदीपान गुंड, मिलिंद खांडेकर, सत्यनारायण बोधले, प्रेमनाथ पाटील, विजयकुमार खडके, गजानन पाटील, हिमालय वाघमारे, धाराशिवसह तुळजापूर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, रुपामाता परिवारातील संचालक, पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे