जेवळी येथे आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा संपन्न,विविध गटातील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
जेवळी येथील महात्मा बसवेश्वरांच्या याञा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत राजभरातून आलेल्या कलाकारनी विविध गितावर उत्कृष्ट नृत्याचा कलाआविष्कार सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. शुक्रवारी (दि.१०) या नृत्य स्पर्धेचा समारोप समूह नृत्य स्पर्धेने करण्यात झाला. यावेळी विविध गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आला.
जेवळी (ता. लोहारा) येथे ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रे निमित्त विविध संस्कृतीक व धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. बुधवार (दि.८) ते शुक्रवार (दि.१०) या काळात तीन दिवशीय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा पार पडल्या. यावेळी या स्पर्धेत राज्यस्तरावरील नामवंत कलाकार सहभागी झाले होते. या नृत्य स्पर्धेचा समारोप शुक्रवारी (दि.१०) समूह नृत्याने करण्यात झाला. या नृत्य समारोपाचे उद्घाटन फौजदार अमोल घोडके यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे निवृत्त उपअभियंता सत्तेश्वर हावळे हे होते. यावेळी इंडियन फॉर्मसिस्ट अशोशियनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तुषार वाघमारे, चन्नबसवा फार्मसी कॉलेजचे (बसवकल्याण) सचिव सुनील देशमुख, भाजप तालुका उपाध्यक्ष शिवाजी दंडगुले, निवृत्त अभियंता शिवराम हावळे, चेअरमन पंडीत पाटील, मुबारक मुजावर, रविराज कारभारी, रवी घोडके, गोविंद जेवळीकर, परमेश्वर हावळे, मेहुल कारभारी, प्रभुराज पणुरे, प्रफुल्ल कानडे, मुन्ना भैरप्पा, सत्तेश्वर ढोबळे, प्रशांत मुरमे, संजय राजपूत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे-
बालगट वैयक्तिक नृत्य स्पर्धा
प्रथम पारितोषिक-शोर्या गोडबोले (लातूर) व गौरी शिंगाडे (अक्कलकोट) तर
द्वितीय – विराट काळे (लातूर) व उर्मिला पवार (जेवळी) यांना विभागून पारितोषिक देण्यात आले.
प्रौढ गटातील लावनी व वैयक्तिक नृत्य स्पर्धा,
स्त्री गट – प्रथम पारितोषिक- प्रियंका अवसार (गंगाखेड),
द्वितीय- स्वेता अवसरमोळ (बीड) व सानिका नागवेकर (पुणे) यांना विभागून पारितोषिक देण्यात आले.
पुरुष गट (प्रौढ) लावणी व वैयक्तिक नृत्य स्पर्धां-
प्रथम पारितोषिक- अभय जोगदंड (परभणी), द्वितीय पारितोषिक- किरण मडके (बीड) व ऋषिकेश राठोड यांना विभागून देण्यात आले.
प्रौढ गटातील समुह नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक- द रायझिंग स्टार ग्रुप (पुणे) व डी डी एस ग्रुप (पंढरपूर)
द्वितीय पारितोषिक- त्रिभूषण अकॅडमी (गंगाखेड) व साई प्रेरणा कला मंच अलिबाग यांनी (विभागून) पटकाविले आहे.
यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व चषक देण्यात आले आहे. या नृत्य स्पर्धेसाठी यात्रा समितीचे अध्यक्ष बसवराज कारभारी,उपाध्यक्ष बाबूराव हावळे, सचिव मल्लीनाथ डिग्गे,महादेव मोघे,शिवशरण कारभारी,गुंडाप्पा कारभारी,सुभाष सारणे, सत्तेश्वर कारभारी, बालाजी निंगशेट्टी, बाळासाहेब कटारे, महादेव सारणे, शंकर कोराळे, रमेश निंगशेट्टी आदींनी पुढाकार घेतला या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून रामचंद्र ढोबळे, शिवाजी माळी व संजय पोतदार यांनी काम पहिले या तीन दिवसीय स्पर्धेत शिवशरण कारभारी यांनी सुत्रसंचलन केले