
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील नागूर येथील हनुमान मंदिरात अस्मिता बहुउद्देशिय सा.संस्थेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून “पुस्तकांची गुढी उभारून हिंदू नवं वर्षाचे स्वागत” केले जाते.
दरवर्षी पुस्तकांची गुढी उभारण्याच्या पाठीमागे हाच उद्देश आहे की,आजच्या युवावर्गानी,बालकांनी मोबाईल मधून बाहेर पडून पुस्तकांच्या सान्निध्यात रमले पाहिजे. पुस्तक हे मस्तक घडविते,घडलेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही.पुस्तक हे मनुष्याला घडविण्याचे कार्य करित असते.पुस्तकां सारखा मित्र नाही.म्हणून पुस्तके हे वाचले पाहिजेत.असे मत अस्मिता बहुउद्देशिय सा संस्थेचे सचिव,सामाजिक कार्यकर्ते यशवंत चंदनशिवे यांनी व्यक्त केले.
पुस्तकाच्या गुढीचे पुजन जेष्ठ नागरिक मारूतीराव जाधव यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.यावेळी शाहुराज भोसले,दगडू पाटील,धनराज जाधव,दादा कपाळे,बाळासाहेब भोसले,बबलू कपाळे,सुरेश चंदनशिवे,शिवाजीराव सलगरे आदि ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.