तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथे साखळी उपोषण – सरपंच क्षिरसागर
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देत !
तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथे साखळी उपोषण – सरपंच क्षिरसागर
तळजापूर : प्रतिनिधी
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आपसिंगा येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात येत असुन या आंदोलनास परवानगी मिळणे बाबत दि.३१ ऑक्टोंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय अपसिंगा यांच्या वतीने पोलीस निरिक्षक तुळजापूर व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनावर असे नमूद केले आहे की मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील दि. 25/10/2023 पासुन आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले असुन या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा येथे साखळी उपोषण करण्यात येणार आहे
या निदेदनावर सरपंच अजित क्षिरसागर, उपसरपंच राहुल साठे, अमर सरडे, अनिकेत सगरे, कृष्णाथ रोंगे, योगेश रोंगे, यांच्या सह गावातील गावातील ग्रामस्थ निवेदन देताना मोठ्या संख्याने उपस्थित होते.