व्यसन मुक्तीचा पुरस्कर्ता हरपला,श्रीशैल्य सुरेश महाराज यांचे दुःखद निधन

व्यसन मुक्तीचा पुरस्कर्ता हरपला,श्रीशैल्य सुरेश महाराज यांचे दुःखद निधन
वागदरी /न्यूज सिक्सर
शिवभक्तीतून व्यसन मुक्तीचे फार मोठे सामाजिक कार्य करणारे श्रीशैल्य मल्लिकार्जुन महादेव मंठाचे पुजारी शिवभक्त श्रीशैल्य सुरेश पाटील महाराज रा.वागदरी ता.तुळजापूर यांचे दि.७/४/२०२३ रोजी सायंकाळी ६.०० वा.दरम्यान अल्पशा अजाराने पुणे येथिल हाँस्पीटलमध्ये उपचारादरम्यान दु:खद निधन झाले.
तुळजापूर तालुक्यातील वागदरी हे गाव एकेकाळी हाळ वागदरी म्हणून ओळखले जात होते. परंतू आलीकडे आगदी पंधरा ते वीस वर्षा मध्ये शिवशंभो महादेव यांच्या भक्ती मार्गाने अर्थात शिवभक्तीतून व्यसन मुक्तीचे कार्य करणारे श्रीशैल्य सुरेश पाटील महाराज यांनी,दारूच्या अहारी जावून व्यसनाधिन झालेल्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील
हजारो लोकांना व्यसन मुक्त करून त्यांच्या कुटुंबात नव चैतन्य निर्माण करून हाळ वागदरीची ओळख महाराजांची वागदरी असी निर्माण केली.
शिव भक्तांच्या सहकार्यातून गावात भव्य दिव्य उंच शिखर असलेले श्रीशैल्य महादेव मंदिर मठाचे बांधकाम करून दूरवरून जिल्यातून परजिल्यातून परराज्यातून व्यसन मुक्त होण्यासाठी वागदरीला येणाऱ्या भाविकांची निवाशी मुक्कामाची राहण्याची सोय त्यांनी केली आहे.गावातील सर्व सन उत्सवात, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रमात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवित असत.
दरवर्षी मठात श्रावणी यात्रा,महाशिवरात्री यात्रा भरवून समाज प्रबोधनपर भजन, किर्तन भारूड वगेरे धार्मिक कार्यक्रम आयोजित करत असत.
दि.१४ एप्रिल २०१२ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरी याना महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा तांबे पितळेच्या धातुचा छोटे खानी पुतळा भेट देऊन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारे चैतन्य निर्माण करून त्यांचे मनोबल वाढविले.
त्यांना मिळालेल्या प्रतिभा शक्तीने हजारो लोकांना व्यसन मुक्त करून भाविक भक्तांचा फार मोठा गोतावळा त्यांनी निर्माण केला आहे. दि.७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वा दरम्यान अल्पशा अजाराने वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांचे दु:खद निधन झाले.त्यांच्या दु:खद निधना बद्दल त्यांना भाव पुर्ण आदरांजली.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले, दोन मुली,जावाई, सुन,नातवंडे, भावंडे असा मोठा परिवार आहे.