
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा येथे सदोष मनुष्यवध घडून यावा या उद्देशाने स्कॉर्पिओ गाडीवर दगडफेक करून मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दि.१४ रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास लोहारा बस स्थानक समोर गोपाळ नरेश सुगंधी रा.पंढरपुर,जि.सोलापूर यांची स्कॉर्पिओ गाडीच्या समोर बालेरो पिकअप आडवे लावून दगडफेक करुन गोपाळ सुगंधी,कार्तीक वालीकर,विश्वनाथसिंग गिरीधरसिंग राजपुत व ओंकार नितीन कदम यांना मारहाण करुन जखमी केले. तसेच गाडीच्या काचा फोडून गाडीचे ६५,००० रुपयेचे नुकसान केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराची फिर्याद गोपाळ सुगंधी यांनी दि.१५ रोजी लोहारा पोलिस ठाण्यात दिली दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो.ठाणे येथे ३०८,३४१, ३२४, १४३, १४७, ४२७, ५०६ भा.दं.वि.सं.अन्वये आरोपी नामे रज्जाक अमीन कुरेशी,अमीन खलील कुरेशी,अलताब अमिन कुरेशी, अफजल सादिक पठाण,रीयाज हनिफ सनाटे रा.लोहारा तसेच एजाज हुसेन कुरेशी,इलियाज हुसेन कुरेशी,आयशिरचा हेलकरी रा. नळदुर्ग व इतर ८ जणा विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.