गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
लोहारा /न्यूज सिक्सर
फत्तेपुर ता. लोहारा येथील- रविना वैजिनाथ भिसे, वय 25 वर्षे, यांनी दि. 27.02.2023 रोजी राहत्या घरात विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. रविना यांची सासु- छायाबाई संभाजी भिसे यांनी वेळोवेळी दिलेल्या शारिरीक व मानसिक जाचास व त्रासास कंटाळून रविना यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताची आई- कविता रामदास बनसोडे, रा. धनलक्ष्मी नगर, गोंधीळी वस्ती, उत्तर सोलापूर यांनी दि. 16.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 498 अ, 306, 323,504अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.