कळंब शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसाय प्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु

कळंब शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत
विविध व्यवसाय प्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया सुरु
उस्मानाबाद/न्यूज सिक्सर
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शासकीय औद्येागिक प्रशक्षिण संस्थेत एक वर्ष मुदतीचे व्यवसाय जसे की, कॉम्प्यूटर ऑपरेटर, प्रोग्रामींग असिस्टंट, ट्रॅक्टर मेकॅनिक हे एस.एस.सी. उत्तीर्ण पात्रतेवर तर वेल्डर व्यवसाय एस.एस.सी. उतीर्ण तसेच अनुत्तीर्ण पात्रतेवर आहे. दोन मुदतीचे व्यवसाय जसे की इलेक्ट्रीशयन, फिटर, मेकॅनिक, मोटर व्हेईकल, सर्व्हेवर हे एस.एस.सी. उतीर्ण पात्रतेवर तर वायरमन हा व्यवसाय एस.एस.सी. हा व्यवसाय एस.एस.सी. उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण पात्रतेवर आहेत. संस्थेत एकूण 236 जागांवर प्रवेश उपलब्ध असून त्यात कॅप सीट 188 व आय.एम.सी. सीट 48 आहेत. हे व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध शासकीय निम-शासकीय तसेच खाजगी कंपनीमध्ये नोकरीला संधी उपलब्ध असून 100 टक्के जॉबची हमी मिळते.
प्रवेशासंबंधी सविस्तर माहिती व ऑनलाईन प्रवेश अर्ज itiadmission portal हे https://admission.devt.gov.in या संकेत स्थळावर प्रवेश इच्छूकांनी संपर्क करावा तसेच कार्यालयीन वेळेत संस्थेत संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य के.जे.पवार यांनी केले आहे.