भूमिपुत्रांना कामावर घ्या,ड्युटी बारा तास ऐवजी आठ तास काम सुरू ठेवा – संभाजी ब्रिगेड
Post - गणेश खबोले

लोहारा / प्रतिनिधी
शासन नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला आठ तासाच्या वर कर्मचाऱ्याकडून काम करून घेतले जात नाही आपण संविधानिक घटनेच्या नियमाचे उल्लंघन करून अनैतिकतेपणाने कर्मचाऱ्याकडून काम करून घेता तरी तुम्ही कर्मचाऱ्याकडून कोणत्या आधारे बारा तास ड्युटी करून घेता. कर्मचाऱ्यावर मालकी हक्क न दाखवता तरतुदीने त्यांच्या ड्युटी बारा तास ऐवजी आठ तास करण्यात यावी व तसेच प्रथम प्राधान्य भूमिपुत्रांना देण्यात यावे अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने काम बंद पाडण्यात येईल याची दक्षता घ्यावी निवेदनावर संभाजी ब्रिगेड तालुकाप्रमुख बालाजी यादव किरण सोनकांबळे खंडू शिंदे गणेश सुरवसे लक्ष्मण लोहार पद्माकर चव्हाण स्वप्निल गुंड शरद जावळे अभिजीत सूर्यवंशी सत्यजित मुसाडे लक्ष्मण पवार ओमकार चव्हाण अमोल बिराजदार अब्बास कारभारी विजय जाधव संजय खरुशे दयानंद चव्हाण आदिच्या स्वाक्षऱ्या होत्या.