पाणी उशाला..कोरड घशाला… सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक राहुल भोसले यांच्यावतीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा शुभारंभ
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

पाणी उशाला..कोरड घशाला…
सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक राहुल भोसले यांच्यावतीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा शुभारंभ
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती झालेली आहे. नगर परिषद मार्फत शहरात आठ दिवस आड एकदा पाणी सोडले जात आहे.अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
तुळजापूर तालुक्यात ३९ तलाव आहेत यात काही तलाव कोरडे पडले आहेत सर्वात मोठा साठवण क्षमता आहे. येथील बोरी धरणातील तलाव येथील पाणी साठा कमी झाल्यामुळे तिर्थ क्षेत्र असलेल्या तुळजापूर नगरीत नागरीकांना व भाविकांना पिण्याचा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तीस हजार हुन अधीक लोकसंख्या असलेले तुळजापूर शहर आहे. नगर पलिकेच्या वतीने शहरात आठ दिवस आड करून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
वास्तविक परिस्थिती पाहून विनोद (पिंटू )गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १४ वर्षा पासून सामाजिक कार्यकर्ते युवा द्योजक राहुल (दादा )भोसले यांच्या वतीने तुळजापूर शहरात आठ दिवसापासून मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.