पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदी अरूण लोखंडे तर सचिव पदी सुनील माळगे यांची निवड

पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदी अरूण लोखंडे तर सचिव पदी सुनील माळगे यांची निवड
वागदरी /न्यूज सिक्सर
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूर च्या तालुका अध्यक्ष पदी पत्रकार अरुण लोखंडे यांची फेर निवड तर तालुका सचिव पदी सुनील माळगे व तालुका उपाध्यक्ष पदी किशोर धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष भैरवनाथ कानडे यांच्या अध्यक्षतेखाली तर पत्रकार संघाचे मंत्रालयीन संपर्क प्रमुख प्रकाश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत नळदुर्ग येथील पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालयात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघची तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली असून ती पुढील प्रमाणे तालुका अध्यक्ष अरूण लोखंडे, उपाध्यक्ष किशोर धुमाळ, सचिव सुनील माळगे, कार्याध्यक्ष विजय पिसे,सहसचिव शाम नागीले,संघटक संजय पिसे, सल्लागार एस.के.गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख ईरफान कझी,सदस्य अजिंक्य मस्के आदींची निवड करण्यात आली.नुतन कार्यकारिणीचे सर्वत्र आभिनंदन होत आहे.