
लोहारा / प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील कानेगाव जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मदन कुलकर्णी हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सहपत्नीक सत्कार लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात शनिवारी ११ फेब्रुवारी रोजी करण्यात आला आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव हे होते. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर वाघमोडे, केंद्रप्रमुख गजानन मक्तेदार, मनोहर वाघमोडे, संत मारुती महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस. पवार,केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक मधुकर रोडगे, एस.आर.कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,न्यू व्हिजन इंग्लिश स्कुल,जिल्हा परीषद शाळा, लोहारा, कानेगाव, कास्ती ,नातेवाईक आदींनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन कुलकर्णी,पत्नी सुरेखा कुलकर्णी यांचा सत्कार केला. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी मक्तेदार यांनी केले. तर आभार मनिषा गोवर्धन यांनी मानले.