न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आ निलेश लंकेचे तुतारीच्या निनादात भव्य स्वागत ! जनभावना कार्यकत्यांचा कौल घेतल्यानंतर निवडणुक लढवायाची कि नाही ठरवणार – आमादार लंके

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

आ निलेश लंकेचे तुतारीच्या निनादात भव्य स्वागत !

जनभावना कार्यकत्यांचा कौल घेतल्यानंतर निवडणुक लढवायाची कि नाही ठरवणार – आमादार लंके

तुळजापूर  : ज्ञानेश्वर गवळी

रनेरचे आ निलेश लंके यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातुन राकाँ शरदपवार गटात सामील होताच शुक्रवार दि१५रोजी तिर्थक्षेञ तुळजापूर येथे आपल्या हजारो कार्यकत्यासह येवुन श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले

. तिर्थक्षेञी त्यांचे तुतारीचा निनाधात फटाक्यांच्या प्रचंड अतिषबाजीत स्विगत झाले यावेळी तिर्थक्षेञ तुळजापूरात त्यांच्या समर्थकांनी स्वागतासाठी लावलेल्या फलकात भावी खासदार हा उल्लेख अनेकांच्या भुवया उंचविणा-या होत्या .नंतर थेट श्रीतुळजाभवानी मंदीरात जावुन मनोभावे दर्शन घेवुन यथासांगा पुजा केली यावेळी त्यांच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपारिक पुजारी प्रविण ( केशव) कदम यांनी केले.यावेळी काँग्रेस चे जिल्हाअध्यक्ष अँड धिरज पाटील जनसेवक अमोल कुतवळ सह राकाँशरदपवारगट चे पदाधिकारी उपस्थितीत होते.
देवीदर्शना नंतर पञकारांशी संवाद साधताना म्हणाले ञकि मी श्रीतुळजाभवानी चा भक्त आहे सातत्याने देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो,. मी राजकिय घराण्यातुन आलो नाही तरीही कार्यकत्यांचा जीवावर मी आमदार झालो मी हारणा-या मधील खेळाडू नाही असे खासदारकी बाबतीत बोलताना म्हणाले देविने साक्षात्कार दिल्यास जनभावना व कार्यकत्यांचा मते घेवुन लढवायाची कि नाही हे ठरवणार असल्याचे म्हणाले भावी खासदार असे बँनर झळकतायत अशा प्रश्न केला असता माझा कार्यकत्यांना वाटते मी मोठा व्हावा त्यात काय वावग आहे असे सांगुन अप्रत्यक्षपणे आपण आपण लोकसभेसाठी इछुक असल्याचे स्पष्ट केले
डाँ सुजय विखेचे आवाहन किती यावर बोलताना ते म्हणाले कि देशाच्या सर्वौच्य नेत्या कै इंदिरा गांधी पराभूत झाल्या हे लक्षात घ्या माझ्या पुढे आवाहने नसतात असे यावेळी म्हणाले

यावेळी राजेंद्र माने ‌ सुनील शिंदे ज् छोटू काका पाटील विकास बापू चव्हाण संतोष मुद्गुले जनार्दन माने औदुंबर करंडे पाटील जबर भाई शेख पप्पू कांबळे वसीम शेख पप्पू पवार अण्णा गुंडगिरी गणेश खोमणे प्रमोद भोरे राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टी चे पदाधिकारी उपस्थितीत होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे