
उमरगा-रोहित गुरव
उमरगा येथील आय एस ओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूल ला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला तीन लाखांचे शासनाकडून बक्षीस मिळाले त्यामुळे ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराजजी चौगुले, युवानेते किरण भैया गायकवाड शिवसेना तालुकाप्रमुख बळीमामा सुरवसे लोहारा शिवसेना तालुकाप्रमुख जगन पाटील गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांच्या हस्ते शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे मुख्याध्यापक पद्माकर मोरे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अशोक पतगे शिक्षणतज्ञ सदानंद शिवदे पाटील व शाळेच्या संपूर्ण शिक्षक स्टाफ चा सत्कार करण्यात आला शाळेने गेल्या पाच वर्षांत अनेक उपक्रम राबविले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, शाळेचे माजी विद्यार्थी आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी केलेले सहकार्याने शाळा समृद्ध झाली आहे यावर्षी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शाळेय इमारतीच्या पायाभूत सुविधेसाठी 60 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. कार्यक्रमाला उमरगा लोहारा तालुक्यातील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या शाळेचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख शिक्षण प्रेमी नागरिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार सुत्रसंचलन प्रविण स्वामी तर आभार प्रदिप मदने यांनी मानले.