
धाराशिव(प्रतिनिधी)
जिल्हा परिषद धाराशिव व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. डिसेंबर महिन्यात धाराशिव जिल्हा स्तरावरील ‘पोस्ट ऑफ द मंथ’ विजेते शिक्षक सौ. सुनंदा निर्मले (कलशेट्टी) मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी लोहारा , श्री. अशोक घोडके सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुंटेवाडी तुळजापूर, वनिता कोकाटे मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हाळवाडी, भूम , श्री. आप्पराव गोफाने सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर जांब भूम, श्री. विशाल सूर्यवंशी सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा, धाराशिव, श्री. नागेश ढगे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोहार, यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदरील पुरस्कार मा.श्री. अशोक पाटील साहेब (जिल्हा शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच सदरील कार्यक्रमाला मा. सुधा साळुंके मॅडम (शिक्षण अधिकारी धाराशिव ( माध्यमिक), विस्तार अधिकारी श्री. दत्तप्रसाद जंगम साहेब, सविता कुंभार मॅडम, वाघमारे साहेब, इतर अधिकारी व पुरस्कार विजेते शिक्षक तसेच ओपन लिंक्स फाऊंडेशन चे सोमनाथ स्वामी(प्रकल्प अधिकारी) उपस्थित होते.
माननीय पाटील साहेब यांनी पुढील कार्यास सर्व शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या व जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना प्रेरणा द्यावी अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त करण्यात आली.