स्व.राजीव गांधी जयंती निमित्त, जवाहर नवोदय विद्यालयाचा बेंगलोर येथे कार्यक्रम.
Post-गणेश खबोले

तुळजापूर-प्रतिनिधी
श्री जवाहर नवोदय विद्यालय धाराशिवच्या सामजिक विज्ञान विभागाने महान,नवोदय प्रवर्तक व संकल्पना जनक व्यक्तिमत्व स्व.राजीव गांधी जयंती निम्मित कृतज्ञ भावनेने बेंगलोर येथील अझीम प्रेमजी विश्रविद्यालयात कार्यक्रम सादर केला.
स्व.राजीव गांधी यांच्यामुळे नवोदय विद्यालयाची बीजे रोवून ग्रामीण भागातील कलागुणांना संधी निर्माण झाली व जवळपास १००० पेक्षा जास्त आय ए एस, आय पी एस,५००० पेक्षा जास्त डॉक्टर,इंजिनिअर आणि कितीतरी प्राध्यापक,शिक्षक,न्यायाधीश उपजिल्हाधिकारी,तहसीलदार,शिक्षणाधिकारी सारखे अनेक उच्चपदस्थ निर्माण करण्याचे व भारतास एक सक्षम मनुष्यबळ देण्याचे स्वप्न आज त्यांच्यामुळे भारतात साकार होत आहे. म् संपूर्ण जंबुद्वीप/भारतातील एकुण ७४८ जिल्ह्यांपैकी ६६१ जिल्ह्यांमध्ये आज नवोदय विद्यालय खूप यशस्वी पद्धतीने,भारत सरकारच्या, केंद्रीय शिक्षण मंत्रालया मार्फत चालत आहेत.
स्व.राजीव गांधी यांच्या 80 व्या जयंती निमित्त या नवोदय जनकाचे अत्यंत कृतज्ञतेने आणि अंतःकरणापासून स्मरण त्यांच्या 80 व्या जयंतीनिमित् बेंगलोर येथील अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी मध्ये पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय तुळजापुर जिल्हा धाराशिवच्या सामजिक विज्ञान विभागाचे चक्रपाणी गोमारे,दिलीप खिल्लारे,भगवान वंजारे यांनी जयंती निमित्त कार्यक्रम घेवून वेगळ्या पद्धतीने साजरा केला. यात अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी चे अनेक फॅकल्टी व समन्वयक उपस्थित होते.