
धाराशिव-प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथील घटक कार्यालयाचे जडसंग्रह वस्तु साहित्यातील व किरकोळ साहित्यातील वापरण्यास अयोग्य असलेल्या संगणक,प्रिंटर,झेरॉक्स मशिन,वॉटर कुलर,फ्रिज,टिव्ही,लोखंडी खुर्च्या,प्लॉस्टीक खुर्च्या, जनरेटर,टेबल,अग्निरोधक सिलेंडर,सिलींग फॅन,टेबल फॅन,छोटे लोखंडी कपाट,लोखंडी रॅक,फॅक्स मशिन,बॅटरी इत्यादी साहित्य कार्यालयाचे स्थापन केलेल्या समित्ती मार्फत अंदाजीत किंमत ७०,००० ते ८०,००० हजार रुपयेच्या साहित्याचा जाहिर लिलाव करण्याचे निश्चीत केलेले आहे. सदरील लिलावात सहभाग घेणा-यांनी दिनांक ०५.०३.२०२४ रोजी ५.०० वाजेपर्यंत नांव नोंदवून लिलाव सहभाग नोंदणी शुल्क रु ५००/- जमा करावी तसेच दुकान परवाना,पॅनकार्ड,आधारकार्ड, जीएसटी नंबर व फॉर्म भरुन द्यावा,जाहिर बोली व घसारा किंमत यांचे अनुषंगाने साहित्य निहाय बोलीद्वारे विक्री होणार आहे.दिनांक ०६.०३.२०२४ रोजी ११.०० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे लिलावासाठी उपस्थित रहावे. (अपरिहार्य कारणास्तव निर्धारित दिनांक बदलल्यास तसे सुचना फलकावर लावण्यात येईल.) सर्व अधिकार हे पोलीस अधीक्षक धाराशिव यांचे अधिन असतील.