
खुदावाडी (सतीश राठोड)
मराठी भाषा बोलने किंवा मराठी माध्यमांतून शिक्षण मिळविणे याला कमी लेखू नये मराठी भाषेचे वापर दैनंदिन जीवनात बोलताना जास्तीत जास्त करावा असे आवाहन प्रा.ज्योतिका राठोड यांनी केले.
येथील कुलस्वामिनी प्राथमिक माध्यमिक व राजश्री शाहू महाविद्यालयात “जागतिक मराठी भाषा गौरव”दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होत्या.प्रारंभी कवीवर्य वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष चव्हाण हे होते.२७ फेब्रुवारी कवीवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस जगभरातील मराठी भाषिकाकडून मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.यावेळी संतोष चव्हाण,शरद सुर्यवंशी शाळेतील विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व विविध गीत सादर केले.यावेळी बाळासाहेब मुक्कम, साबळे सर, कदम सर, बालाजी राठोड,किरण ढोले, देवानंद पांढरे, संतोष दुधभाते, शांताबाई चौगुले, प्रमिला कंचुगे, अश्विनी लबडे, यांच्या सह शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हक्के बी.जी यांनी केले तर आभार लंवग मॅडम यांनी मानले.