धाराशिव लोकसभा समन्वयकांचे पहिल्या दौऱ्यात माणुसकीचे दर्शन, भाजपची धुंडशाही मोडायला जनता सज्ज: ( ठाकरे गट) स्वप्निल कुंजीर
धाराशिव लोकसभा समन्वयकांचे पहिल्या दौऱ्यात माणुसकीचे दर्शन, भाजपची धुंडशाही मोडायला जनता सज्ज: ( ठाकरे गट) स्वप्निल कुंजीर

धाराशिव लोकसभा समन्वयकांचे पहिल्या दौऱ्यात माणुसकीचे दर्शन, भाजपची धुंडशाही मोडायला जनता सज्ज: ( ठाकरे गट) स्वप्निल कुंजीर
धाराशिव: प्रतिनिधी
धाराशिव लोकसभेचे ठाकरे गटाचे समन्वयक स्वप्नील कुंजीर हे दोन दिवसीय धाराशिव दौऱ्यावर आले असता तुळजापूर विधानसभा पदाधिकारी बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पडली, व उद्धव ठाकरे यांना कोल्ह्या कुत्र्यांच्या टोळीने घेरले आहे. पण वाघाची शिकार करणे कोल्ह्या कुत्र्यांचे काम नाही, असे प्रतिपादन स्वप्निल कुंजीर यांनी बोलताना केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांना आव्हान करताना कुंजीर म्हणाले की भाजपची झुंडशाही हुकुम शाही मोडायला जनता सज्ज आहे. फक्त तुम्ही जनतेपर्यंत पोहचा आणि त्याचे मतात रूपांतर करा आसे आव्हान कुंजीर यांनी उपस्थित पदाधिकारी यांना केले.
शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव लोकसभा समन्वयक स्वप्नील कुंजीर दोन दिवसीये धाराशिव दौऱ्यावर असताना तुळजापूर येथे आई तुळजा भवानीची महा आरती करुन त्यांनी दौऱ्यास सुरुवात केली, व दिवसभराच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद होता परंतु धारशीव जिल्ह्याचे उप जिल्हा प्रमुख सुरेशआप्पा वाले हे दौऱ्यात दिसत नाहीत हे लक्षात येताच त्यांनी विचारणा केली असता त्यांचा मोठा अपघात झाला असून गेली तीन महीने घरी झोपुन आहेत. आसे समजताच स्वप्निल कुंजीर यांनी ताबडतोब नियोजित दौऱ्यात बदल करुन प्रथम शिवाजी वाले यांच्या घरी भेट दिली, आणि सर्व पदाधिकारी सोबत घेऊन ते दालिंब या त्यांच्या गावी गेले त्यांची आस्तेवाईक चौकशी केली आणि पुढील उपचारांची काही आवश्यकता वाटली तर पुण्यातील मोठ्या हॉस्पिटल मध्ये व्यवस्था करू असे सांगितले. यामुळे निष्ठावान शिवसैनिक कसा असावा याची प्रचिती आली सर्व शिवसैनिकांना याचे कौतुक वाटले.
मुंबईवरुन नेमलेले ठाकरेंचे शिलेदार असावे तर आसे असावेत अशी भावना यावेळी शिवसैनिकांनी बोलून दाखवली.
यावेळी सहसंपर्क प्रमुख मकरंदराजे निंबाळकर, शहर प्रमुख सुधीर कदम, युवासेना शहर प्रमुख सागर इंगळे, तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, युवा सेना तालुका अधिकारी प्रतीक रोचकारी, मा. उपजिल्हा प्रमुख शामभाऊ पवार, माजी तालुका प्रमुख बालकृष्ण घोडके, संजय भोसले, विकास भोसले, बापू नाइकवडे, बाळासाहेब शिंदे, प्रदीप इंगले, अर्जुन साळुंखे, बालाजी पांचाल, व स्थानिक नागरिक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.