न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

तहसील कार्यालायात लिफ्ट ची व्यवस्था करा-प्रहार दिव्यांग संघटनेची मागणी

तहसील कार्यालायात लिफ्ट ची व्यवस्था करा-प्रहार दिव्यांग संघटनेची मागणी

तुळजापूर : प्रतिनिधी

 प्रहार संघटनेच्या वतीने तालुक्याचे दि.२८ एप्रिल रोजी नूतन तहसीलदार डॉ शिवानंद बिडवे साहेब यांचे स्वागत करण्यात आले आणि पुढील कार्यास शुभेच्या देखील देण्यात आल्या.
यावेळी चर्चेदरम्यान मागील कित्येक वर्षांपासून उस्मानाबाद तहसील कार्यालयात तालुक्यातुन विविध भागांतून नागरिक आपली कामे घेऊन तहसील कार्यलायत येतात यामध्ये तालुक्यातील दिव्यांग व वयोवृद्ध नागरिक देखील जास्त प्रमाणात आपले कामे करण्यासाठी येतात यावेळी वरमजल्यावर बऱ्याच वेळा या सर्व व्यक्तींची धावपळ दिसून येते या मध्ये अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना तर वर देखील जाता येत नाही रेशन कार्ड लाभधारकाना पुटवठा विभागात आपले रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी वर जावे लागते या मध्ये जास्त प्रमाणात दिव्यांगाची हेळसांड होते या अनुषंगाने प्रहार दिव्यांग क्रांती उस्मानाबाद चे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे,जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,शिवकुमार माने,दत्ता पवार,रामलिंग कांबळे व प्रहारचे इतर पदधिकारी यांच्या उपस्थितीत हे विषय मांडण्यात आले
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता मा.तहसील महोदयानी या लिफ्ट संदर्भात लकवरात लवकर कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिले या निर्णयाबद्दल कर्तव्यदक्ष तहसीलदार सहबांचे प्रहारच्या वतीने अभिनंदन देखील करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे