आंबेडकर जयंतीनिमित्त मंगरुळ येथे भव्य मिरवणूक
आंबेडकर जयंतीनिमित्त मंगरुळ येथे भव्य मिरवणूक.

आंबेडकर जयंतीनिमित्त मंगरुळ येथे भव्य मिरवणूक.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तालुक्यातील मंगरूळ येथे बी आर तरुण मंडळाच्या वतीने डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त डाँ बाबासाहेब आंबेडकर,तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्ती सह छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,आण्णाभाऊ साठे,अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करीत भव्य मिरवणूक बुधवार रोजी काढण्यात आली.
प्रारंभी पो नि अजिनाथ काशीद,वंचित बहुजन आघाडी चे नेते मिलिंद रोकडे, तुळजापूर तालुका पत्रकर संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, सरपंच महेश डोंगरे, मा. उप ससंच प्रतापसिंह सरडे , प स सदस्य चित्तरंजन सरडे, जि. प. सदस्य महेंद्र धुगुडे, ग्रा पं सदस्य प्रशांत आप्पा जेष्ठीथोर आदिंच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष राहुल जेष्ठीथोर , उपाध्यक्ष महादेव जेट्टीथोर, बी आर ग्रृपये सर्व सदस्य पदाधिकारी
आदी उपस्थित होते.