न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठा – कुणबी समाजाचे सर्वेक्षण त्यानुसार,७२२५२ हजार कुटूंबा सर्वेक्षण पुर्ण झाले – तहसिलदार अरविंद बोळंगे

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

मराठा – कुणबी समाजाचे सर्वेक्षण त्यानुसार,७२२५२ हजार कुटूंबा सर्वेक्षण पुर्ण झाले – तहसिलदार अरविंद बोळंगे

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

मराठा – कुणबी समाजाचे दिलेल्या मुदतीत सर्वेक्षण पूर्ण होऊ शकत नसल्याने राज्य सरकारने दोन दिवसांची मुदतवाढ दिली होती, त्यामुळे उर्वरित सर्वेक्षण दोन दिवसात पूर्ण करण्याची जबाबदारी तहसिलदार अरविंद बोळंगे या अधिकाऱ्यांनी ७२२५२ हजार घरांचे सर्वेक्षण पुर्ण करून जबाबदारी पार पाडली.सरकारने दिलेल्या आदेशानुसार नगर पालीका व महसूल प्रशासनाकडून मराठा समाज सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागासलेपण तपासण्याचे काम या सर्वेक्षणाद्वारे केले जात होते. संबंधित सर्वेक्षण दि.३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सरकारने दिले होते.

तुळजापूर तालूक्यासह ७२२५२ हजार नी महसूल प्रशासनाने प्रत्येक्षात जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी ५०२ महसूल कर्मचारी,अन्य १७ एकून ५१९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ५१९ कर्मचाऱ्यांवर दक्षता म्हणून ४ नायब तहसीलदार नेमण्यात आले होते.

तहसिदार यांनी कमी वेळेत जास्त कर्मचारी लावून सर्वेक्षण पुर्ण केल्या मुळे मराठा ठोक क्रांती मोर्चा चे महाराष्ट्र राज्य समन्वयक आबासाहेब कापसे,रोटरी क्लबचे सचिव प्रशांतराव अपराध, पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, गोविंद खुरूद यांनी तहसिलदार बोळंगे यांचा फेटा हार पुष्प गुच्छ, पेढा भरवून सत्कार करण्यात आला.

 

यात खुल्या प्रयोगाती – २७२९४ कुटूंबाचे तसेच मागासवर्गीय कुटुंबाचे ४४२५८ सर्वेक्षण करण्यात आले. यात तालुक्यासह शहरातील १२३१ कुटुंब त्यांच्या राहत्या घरी जागी नव्होते तर ९ कुटुंबानी प्रतिसाद दिला नाही.शहराचा विस्तार व लोकसंख्येचा विचार करता, संबंधित सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता नव्हती पण पुर्ण झाले

अरविंद बोळंगे, तहसिलदार तुळजापूर.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे