
लोहारा- प्रतिनिधी
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे महिला बहूउददेशिय केंद्र कानेंगांव ता लोहारा जिल्हा धाराशिव येथे जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्य करणाऱ्या व विविध क्षेत्रातील महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आले .
८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री गोरे ग्रामविकास अधिकारी कानेगांव व सौ आशाताई सुभाष कदम सरपंच कानेगांव उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आले तर उपस्थित मान्यवरांनी
महिलांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी ताई नागरेकर,सारीका वाघमारे, गोकर्णा कदम, मंगलताई गायकवाड,यानी मनोगत व्यक्त केले तर या कार्यक्रमास विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या रणरागिनी तसेच गावातील महीला मोठ्या संख्येत उपस्थित राहून सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला बहूउददेशिय केंद्र कानेंगांव कर्मचारी श्रीमती प्रगती माने,सौ तनुजा मोरे यांनी परिश्रम घेतले.