ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
वंचित बहुजन आघाडी मध्ये ढोकी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

वंचित बहुजन आघाडी मध्ये ढोकी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश
धाराशिव/न्यूज सिक्सर
धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथील शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेत्रुत्वावर विश्वास ठेऊन तसेच तसेच मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण रणबागूल ,जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे,जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, युवक जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ढोकी येथील अजय कदम व रसूल पठाण राहूल कोरे यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये शासकीय विश्रामगृह येथे दि.१६ जानेवारी जाहीर प्रवेश केला.
येणाऱ्या लोकसभा, विधानसभा तसेच येणाऱ्या सर्व निवडणूकीसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढवण्यासाठी हा जाहीर पक्ष प्रवेश पार पडला आहे.आज वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्व समाज घटकाला सोबत घेऊन सर्व घटकापर्यंत पोहोचवून आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करत आहे असे मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण रणबागूल यांनी म्हटले आहे.
यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादाराव रणबागूल,जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे ,युवा जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण, जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड, जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, जिल्हा उपाध्यक्ष वैभव गायकवाड, युवा जिल्हा संघटक बाबा वाघमारे ,युवक तालुका अध्यक्ष सागर चंदनशिवे, जीवा सेना जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे, जिल्ह्याचे वरिष्ठ नेते प्रशांत शिंदे,अरुण गरड, रमेश गंगावणे, विकास बनसोडे, जिल्हा युवा प्रसिद्धीप्रमुख प्रमुख कृष्णा शिनगारे, सोमनाथ नागटिळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते